टर्निंगमध्ये दोन अक्ष आणि स्पिंडल असे कॉम्बिनेशन असते. आडवा (हॉरिझॉन्टल) Z अक्ष आणि त्याला काटकोनात X अक्ष असतो. साध्या एकरेषीय टर्निंगबरोबरच कंस (आर्क) किंवा त्रिज्या असणार्या कार्यवस्तुसुद्धा यंत्रण करता येतात. खालील उदाहरणांमध्ये कार्यवस्तूवरील विविध त्रिज्यांचे यंत्रण टर्निंग मशिनवर कशा पद्धतीने करता येते, हे दाखविले आहे. पहिल्या उदाहरणातील तीन R5 कंस त्रिज्या (आर्क रेडियस) तर R10 ची एक कंस त्रिज्या (चित्र क्र. 1) यांचे यंत्रण करणे आव्हानात्मक असते. उदाहरण 2 मध्ये R6 कंस कर्व्ह आणि चॅम्फर (चित्र क्र. 2) करावयाचा आहे. त्यासाठीचे प्रोग्रॅम, कमांड आणि स्पष्टीकरण अशा स्वरूपात पुढे दिले आहेत.
चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेल्या यंत्रभागाला अनेक ठिकाणी कंसात्मक आकार येण्यासाठी कंस त्रिज्या मापांमध्ये यंत्रण करावयाचे आहे. या यंत्रभागाचा मोठा व्यास 80 मिमी. असून लहान व्यास 30 मिमी. आहे.
R5 च्या 3 कंस त्रिज्या आणि R10 च्या 1 कंस त्रिज्यांचे यंत्रण करावयाचे आहे. त्यासाठीचा प्रोग्रॅम तक्ता क्र. 1 मध्ये दिला आहे.
चित्र क्र. 2 मध्ये दाखविलेल्या यंत्रभागाचा एका बाजूचा व्यास 38 मिमी. असून दुसर्या बाजूचा व्यास 18 मिमी. आहे. 18 मिमी. व्यासाच्या बाजूला R6 त्रिज्येमध्ये यंत्रण करावयाचे आहे. मध्यभागी 36 मिमी. व्यास असून तेथे चॅम्फर करावयाचा आहे. यासाठीचा प्रोग्रॅम तक्ता क्र. 2 मध्ये दिला आहे.
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.