खाचांचे मिलिंग

03 Jan 2020 16:04:00
 
 
सर्वसामान्यपणे मिलिंगसाठी मिलिंग मशिन वापरले जाते. काही विविक्षित ठिकाणी टर्निंग मशिनवर मिलिंग ऑपरेशन करून अवघड वाटणारी कार्यवस्तू (उदाहरण 1) सहजासहजी करता येते. त्यासाठी C अक्ष आणि लाइव्ह टूलिंग यांचा वापर करून घेतला आहे. उदाहरण 2 मध्ये कोऑर्डिनेट सिस्टिम रोटेशनचा वापर करून 45° कोनावर कार्यवस्तुचा विविक्षित आकार मिलिंग मशिनवर तयार केला आहे. 
 

T1_1  H x W: 0  
 
उदाहरण 1
 

1_1  H x W: 0 x 
 
चित्र क्र. 1 मध्ये दाखविलेल्या कार्यवस्तूवर अ‍ॅक्सियल किंवा फेस मिलिंग करावयाचे आहे. 1” व्यास असलेल्या फेसवर C अक्षाचा वापर करून 1/4” रुंदीची खाच करावयाची आहे. यासाठी C अक्षाचा सरकवेग इंच/मिनिटांमध्ये घ्यावा लागेल. नियंत्रक (कंट्रोलर) निवडलेल्या सरकवेगाप्रमाणे स्पिंडलची फिरण्याची गती ठरवितो. त्याकरिता सेटिंग 102 C अक्ष व्यासामधील मूल्याचा वापर केला जातो. तक्ता क्र. 1 मधील प्रोग्रॅममध्ये पॅरामीटर (सी.एन.सी. नियंत्रकामधील सेटिंग पॅरामीटर 102 ) 1 या व्यासाच्या मूल्याला सेट केला आहे. 
 
चित्र क्र. 1 मध्ये N3, N4, N6, N7, N8 दाखविलेले मार्ग हे प्रोग्रॅममधील पायर्‍या आहेत. त्याचे वर्णन प्रोग्रॅममध्ये दिले आहे. Z-X प्लेनचा वापर करून त्याबरोबर C अक्ष घेऊन अपेक्षित असणार्‍या फेसचे मिलिंग केले आहे. चित्र 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे अशा तर्‍हेच्या कार्यवस्तूवर अ‍ॅक्सियल किंवा फेस मिलिंग करता येते. ठराविक व्यास असलेल्या फेसवर C अक्षाचा वापर करून हव्या असणार्‍या रुंदीची खाच करता येते. लाइव्ह टूल दन प्लेन आणि XZ अक्ष त्यांचा उत्कृष्ट वापर करून अवघड वाटणारी कार्यवस्तू अगदी सहजपणे करता येते. लाइव्ह टूल (फिरणारे टूल) आणि C अक्षाचा वापर करून हव्या असणार्‍या अंशामध्ये मिलिंग करता येते.
 
उदाहरण 2 
 
चित्र क्र. 2 मध्ये एका ठराविक भौमितिक आकाराचे 8 ठिकाणी यंत्रण करावयाचे आहे. प्रत्येक दोन भौमितिक आकारामध्ये 45° कोन आहे आणि मध्यापासून 21, 10, 10 अशी प्रत्येक भागाची मापे दिली आहेत. कोऑर्डिनेट सिस्टिम रोटेशनचा वापर करून प्रत्येक 45° वर एक याप्रमाणे 8 भौमितिक आकार तयार केले आहेत. चित्र क्र. 2 मध्ये सुरुवातीचा बिंदू X0 Y0 असा समजला आहे. याचा प्रोग्रॅम तक्ता क्र. 2 मध्ये दिला आहे. 
 

T2_1  H x W: 0  

2_1  H x W: 0 x 
 
 

satish_1  H x W 
सतीश जोशी
लेखक आणि सल्लागार
8625975219
sheetalcomp@yahoo.com
 
 
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0